PHOTO: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील जयदीप-गौरी पुन्हा आले एकत्र; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:40 IST2025-02-04T16:31:35+5:302025-02-04T16:40:24+5:30

'लग्नानंतर होईलच प्रेम' अन् 'ठरलं तर मग' च्या महासंगीत सोहळ्यात रंगली जयदीप-गौरीची जुगलबंदी.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरीही मालिकेची क्रेझ काही कमी झालेली नाही.

यामध्ये गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, मालिका संपल्यानंतर आता महिनाभरात जयदीप-गौरीने स्टार प्रवाहवर कमबॅक केलं आहे.

'लग्नानंतर होईलच प्रेम' अन् 'ठरलं तर मग' च्या महासंगीत सोहळ्यात जयदीप-गौरी हजेरी लावणार आहेत.

शिवाय या संगीत सोहळ्यात त्यांचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळणार आहे.

याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. पुन्हा पडद्यावर लाडक्या जयदीप-गौरीला पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

९ फेब्रुवारीला 'ठरलं तर मग' आणि 'लग्नानंतर होईल प्रेम' मालिकांचा तीन तासांचा महासंगीत सोहळा सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाहवर पाहता येईल.