नऊवारी साडीमध्ये रुबाबदार दिसली भोसलेंची सून, सुगंधा मिश्राचा हा मराठमोळा अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल 'लय भारी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:23 IST2021-05-05T15:17:02+5:302021-05-05T15:23:18+5:30
नुकतेच लग्नबंधनात अडकलेले सेलिब्रेटी कपल सुंगधा मिश्रा आणि संकेत भोसले सोशल मीडियावर सध्या चर्चेचे विषय ठरले आहेत. लग्नामध्ये झालेली धमाल मस्तीचे फोटो सा-यांनी पाहिले मात्र लग्नानंतर सुगंधा मिश्राचा मराठमोठा अंदाजही खास आहे.

सुगंधा मिश्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.
मेहंदी पासून ते लग्नाच्या रिसेप्शनपर्यंत सगळेच फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले.
मराठमोळ्या डॉ. संकेत भोसलेशी लग्न केल्यानंतर सुगंधा भोसले कुटुंबाची सून बनली आहे.
लग्नानंतरच्या पूजेसाठी सुगंधाने खास नऊवारी साडी परिधान केली होती.
त्यामुळे अगदी मराठमोळ्या पद्धतीने साज श्रृंगार केलेल्या सुगंधाचा नवीन फोटो समोर आला आहे.
खुद्द सुगंधानेच मराठमोळ्या अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
निळ्या लाल रंगाची कॉम्बिनेशन असलेली नऊवारी साडी तिने नेसली आहे.
तिने मराठमोळ्या पद्धतीने साडीसोबत दागदागिने परिधान केले आहेत.
नऊवारी साडीत सुगंधाच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत.
सुगंधाचा हे फोटो तिच्या फॅन्सना आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत आहेत.