सौम्या टंडनने ४ वर्षांपूर्वी सोडलं होतं 'भाबीजी घर पर हैं!', म्हणाली - "बॉयफ्रेंडला म्हटलं होतं आता मी...."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 07:04 PM2024-05-27T19:04:06+5:302024-05-27T19:16:51+5:30

Bhabhiji Ghar Par Hain : छोट्या पडद्यावरील मालिका 'भाबीजी घर पर हैं!'मधून प्रत्येक पात्राला घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले.

छोट्या पडद्यावरील मालिका 'भाबीजी घर पर हैं!'मधून प्रत्येक पात्राला घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले.

चार वर्षांपूर्वी तिने या मालिकेला निरोप दिला तेव्हा चाहत्यांना धक्का बसला होता. इतक्या वर्षांनंतरही सौम्या टिव्ही स्क्रीनवरून गायब आहे. तसेच, तिला या मालिकेत काम करायचे नव्हते, त्यामुळे तिचं करिअर बर्बाद होईल असे तिला वाटत होते.

सौम्या टंडनने 'डिजिटल कॉमेंटरी'ला दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की तिने ही मालिका साइन केली होती, पण तिला भीती होती की यामुळे तिचे करियर खराब होईल.

६-७ महिने प्रतीक्षा करूनही सौम्या सेटवर आली नाही, तेव्हा निर्मात्यांना कायदेशीर कारवाईची धमकी द्यावी लागली. त्यानंतर अभिनेत्री सेटवर पोहोचली आणि पुढे काय झाले ते सर्वांना माहितीच आहे. नंतर सौम्याला तिच्या गैरसमजाबद्दल मनापासून पश्चाताप झाला.

३९ वर्षीय सौम्या टंडन म्हणाली, 'जेव्हा मी मालिकेचे शूटिंग सुरू केले तेव्हा मला वाटले की ही माझ्या करिअरमधील मोठी चूक आहे. हे मला बुडवेल. त्यावेळी माझ्या बॉयफ्रेंडला मी फोन करून सांगितले होते की, आता मी भाभीजी म्हणून ओळखली जाईन आणि मी स्वतःला उद्ध्वस्त करून घेतले आहे.

सौम्या इतकी घाबरली की ती 'भाभीजी घर पर है!'च्या निर्मात्यांना भेटली आणि त्यांना सांगितले की तिला ही मालिका करायची नाही.

काही आठवड्यांत ही मालिका सुरू होणार असल्याने निर्मात्यांनी सांगितले की, तिने तसे केल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यानंतर सौम्याने शूटिंग सुरू केली. नंतर तिला समजले की या मालिकेत सामील होणे योग्य आहे कारण ती अशा पात्रासाठी बनविली गेली आहे.

या मालिकेत सौम्याने 'भाभीजी'ची भूमिका पाच वर्षे केली होती. चाहते तिला 'गोरी मॅम' म्हणूनही हाक मारतात. ती शोमधून बाहेर पडतानाही निर्माते तिला थांबवत होते, पण तिने आधीच निर्णय घेतला होता.

तिचे आर्थिकदृष्ट्याही खूप नुकसान झाले, कारण तिला एका एपिसोडसाठी चांगली रक्कम मिळायची. पण आता ती नव्या संधीच्या शोधात आहे. नवीन माध्यमांसाठीही ती स्वत:ला तयार करत आहे.

२०२० मध्ये सौम्याने 'भाबीजी घर पर हैं!' मालिकेचा निरोप घेतला होता. तेव्हापासून म्हणजेच ४ वर्षांपासून ती स्मॉल स्क्रीनपासून दूर आहे.

'जब वी मेट' आणि 'वेलकम टू पंजाब' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली सौम्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती रील आणि फोटो पोस्ट करत असते.