मालिकेत केली सासूची भूमिका, लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली अभिनेत्री; दिसते खूपच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:47 IST2026-02-26T13:37:45+5:302026-02-26T13:47:05+5:30
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतली हिना खानची सासू दिसतेय ग्लॅमरस, फोटो पाहिलेत का?

मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार आज इंडस्ट्रीतून गायब आहेत. कोणी घर संसारात रमलं आहे तर कोणी कायमचे परदेशात स्थायिक झाले आहेत.

टेलिव्हिजनवर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिका माहित असेलच. या मालिकेचे ५ हजारांहून अधिक एपिसोड झाले आहेत. तसंच सध्या यात सर्व नवीन कलाकार आहेत.

मात्र या मालिकेमुळे हिना खान, करण मेहरा ही जोडी प्रसिद्ध झाली होती. त्यांना अनेकदा फेवरेच कपलचा पुरस्टारही मिळाला.

मालिकेत हिनाच्या सासूच्या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री आठवतेय? ही आहे सोनाली वर्मा. तिने गायत्रीची भूमिका साकारली होती. आता कुठे आहे अभिनेत्री?

अभिनेत्री सोनाली वर्मा मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात होती. मात्र यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न केलं आणि ती भारताबाहेर गेली. तिने मनोरंजनक्षेत्र सोडलं.

सोनाली पतीसोबत अमेरिकेत स्थायिक आहे. तिथेच त्यांनी संसार थाटला आहे. तिला एक मुलगाही आहे. सोनाली अमेरिकेत राहून सोशल मीडियावर सक्रीय असते.

अभिनयाआधी सोनाली वर्मा पत्रकार होती. ती एका वृत्त वाहिनीवर निवेदिका होती. १० वर्ष तिने तिथे काम केलं होतं. नंतर तिने अभिनयात प्रवेश घेतला होता.

सोनालीचे इन्स्टाग्रामवर ९९ हजार फॉलोअर्स आहेत. कुटुंबासोबतचे आणि इतर दैनंदिन आयुष्यातले रील्स ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते आणि चाहत्यांसोबत जोडलेली राहते.

















