मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या साखरपुड्याचे काही खास क्षण, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:28 IST2020-06-22T20:10:20+5:302020-06-22T20:28:53+5:30

लवकरच ही अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

शर्मिष्ठा लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार असून 21 जून रोजी तेजस देसाईसोबत तिचा साखरपुडा झाला आहे. 

ही माहिती स्वतः शर्मिष्ठाने सोशल मीडियावर दिली आहे. 

तिने साखरपुड्याचे काही खास फोटोदेखील शेअर केले आहेत.

शर्मिष्ठाचा साखरपुडा एप्रिल महिन्यात होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे तो पुढे ढकलला गेला.

लॉकडाऊनचे काही नियम शिथिल झाल्याने इगतपुरीच्या रिसोर्टमध्ये 35 जणांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.

लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं पालन करुन शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या साखरपुड्याचा सोहळा संपन्न झाला.

येत्या ऑक्टोबर महिन्यात शर्मिष्ठा आणि तेजस विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते.

शर्मिष्ठा सध्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत ‘संयोगिता’ची भूमिका साकारात आहे.