स्मृती ईराणी बनल्या सर्वात महागड्या टिव्ही अभिनेत्री, एका एपिसोडसाठी घेतात एवढं मानधन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:42 IST2025-08-08T16:33:29+5:302025-08-08T16:42:03+5:30

स्मृती ईराणी यांनी टीव्ही क्षेत्रातील कमाईच्या बाबतीत मोठा विक्रम केलाय.

'क्योंकि सास भी कभी बहू थी २' या लोकप्रिय मालिकेमुळे स्मृती ईराणी (Smriti Irani) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

'तुलसी विराणी' या लोकप्रिय भूमिकेतून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला पुन्हा सुरुवात केली आहे. स्मृती यांना पुन्हा टीव्हीवर पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

स्मृती ईराणी यांनी टीव्हीवर कमबॅक करताच सगळीकडे त्यांची चर्चा पाहायला मिळतेय.

गेल्या काही वर्षांपासून स्मृती राजकारणात सक्रिय होत्या आणि त्यांनी कलाक्षेत्रापासून थोडं अंतर ठेवलेलं होतं. मात्र आता, त्यांच्या कमबॅक बरोबरच त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत एक नवा विक्रमही रचला आहे.

स्मृती ईराणीने छोट्या पडद्यावरील अनेक टॉप कलाकारांना मानधनाच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

त्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री बनल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, स्मृती ईराणी या मालिकेतील प्रत्येक एपिसोडसाठी १४ लाख रुपये मानधन घेत आहेत.

या शोचे एकूण १५० एपिसोड्स असणार असून, एकूण कमाई २१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे त्या भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या आहेत.

२००० साली 'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिका सुरू झाली होती. ८ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर २००८ मध्ये मालिकेने निरोप घेतला. आता नव्या दमात पुन्हा मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

स्मृती ईराणी यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्मृती इराणी यांनी त्यांच्या कुटुंबाची एकूण १७.६ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले होते.

जंगम आणि स्थावर मालमत्ता प्रतिज्ञापत्रानुसार, स्मृती आणि त्यांच्या पतीची एकूण जंगम मालमत्ता ६.३८ कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता ११.१७ कोटी रुपये आहे. इराणी यांच्या जंगम मालमत्तेत ३७ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आहेत. तर २७ लाख रुपयांच्या कार, २५ लाख रुपयांच्या बँक ठेवी आणि सुमारे १.२५ कोटी रुपयांची गुंतवणूक समाविष्ट आहे.