प्रसाद ओकसोबतच्या हॉट सीन्सवर श्वेता शिंदे म्हणाली, "एवढ्याशा जागेत आम्ही दोघं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:55 IST2026-04-05T11:44:21+5:302026-04-05T11:55:24+5:30
मी याचं श्रेय दोन लोकांना देईन..., श्वेता शिंदे काय म्हणाली?

मराठी मालिका, सिनेमांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता शिंदे आज निर्माती म्हणून ओळखली जाते. 'लागिरं झालं जी','देवमाणूस','लाखात एक आमचा दादा' अशा तिच्या अनेक मालिका गाजल्या.

याआधी काही वर्षांपूर्वी श्वेता मराठी मालिकांमध्ये खूप लोकप्रिय चेहरा होती. 'अवघाची संसार','चार दिवस सासूचे' या आयकॉनिक मालिकांचा ती भाग होती.

२००६ साली आलेल्या'अवघाची संसार'मालिकेत श्वेता एकदम हॉट खलनायिका होती. तिच्या साड्यांची फॅशन, फिगर यामुळे ती कमालीची बोल्ड दिसायची.

मालिकेत तिने प्रसाद ओकसोबत काही इंटिमेट सीन्स दिले होते. त्यावर नुकतंच श्वेताने भाष्य केलं आहे. ते सीन्स करताना काय आव्हानं आली याचा तिने खुलासा केला.

भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली,"बापरे! त्यावेळेला पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवरती एवढे हॉट आणि स्टीमी सीन्स शूट झाले. पण मला याचं श्रेय दोन पुरुषांना द्यावं वाटतं. एक अभिनेता प्रसाद ओक आणि दुसरे दिग्दर्शक मंदार देवस्थळी."

"सहकलाकार आणि दिग्दर्शक ही दोन माणसं जोपर्यंत तुम्हाला कंफर्टेबल करत नाही तोवर तसे सीन्स होणे नाही. ते सीन्स शूट करताना प्रसाद आणि माझ्यासाठी अनेक आव्हानं होती."

"एवढीशीच जागा त्यात असंच उभं राहायचं असा तो स्ट्रगल होता. मला आठवतंय एक एवढासाच कोपरा होता आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं उभे राहायचो. काही करायला जागाच नव्हती."

"आम्ही एकमेकांच्या पायात पाय घालून कसेतरी उभे राहायचो. त्यात माझी साडी सावरायला लागायची. हा असा सगळा स्ट्रगलच होता. स्क्रीनवर सीन्स पाहून लोकांना असं वाटायचं काय करतायेत, यांच्यात काय चाललंय...पण त्यामागचा हा स्ट्रगल कोणालाच माहित नव्हता."

"माझे तसे सीन्स पाहून आईला तर डिप्रेशनच यायचं. बापरे! आता लोकांना काय वाटेल, हिच्याशी लग्न कोण करेल? असं तिला वाटायचं. ती मला म्हणायची, 'मला अजिबात बघवत नाहीये, असं करु नकोस'.

"पण मी आणि प्रसादने ते सीन्स खूप एन्जॉय केले. खूप छान पद्धतीने केले. तसं माझ्या प्लेन साड्यांची फॅशन आणि ब्रोकेड ब्लाउज हेही खूप पसंतीस पडलं."

















