शिवानी सोनारने होणाऱ्या नवऱ्यासोबत साजरा केला गणेशोत्सव, बाप्पासोबत खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 14:07 IST2024-09-08T14:02:47+5:302024-09-08T14:07:52+5:30
मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन केलं (shivani sonar, ganeshotsav 2024)

मराठी मनोरंजन लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार. शिवानी सोनारच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होतात
शिवानी सोनारचा यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण यावर्षी शिवानी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन करतेय
शिवानीने सोशल मीडियावर तिचा होणारा नवरा अंबर गणपुलेसोबतचे फोटो पोस्ट केलेत. अंबर शिवानीच्या घरी गणपतीला गेला होता
शिवानीचा भाऊ हर्षने बहिण आणि होणाऱ्या जिजूंचे हे खास फोटो कॅमेरात टिपले आहेत. शिवानीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे
शिवानी आणि अंबर अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर या दोघांनी नातेवाईक-मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा केला
शिवानी आणि अंबर साखरपुड्यानंतर लग्न कधी करणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
शिवानी सध्या सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेत तर अंबर सध्या कलर्स मराठीवरील दुर्गा या मालिकेत झळकत आहे