Photos: साज ह्यो तुझा...! शिवाली परबच्या बहिणीला पाहून चाहत्यांचा जीव गुंतला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:26 PM2024-05-24T16:26:23+5:302024-05-24T17:00:51+5:30

शिवाली परबची बहीण 'स्नेहा'चं घायाळ करणारं सौंदर्य

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून सर्वांना खळखळून हसवणारी शिवाली परब (Shivali Parab) घराघरात लोकप्रिय आहे. 'कल्याणची चुलबुली' अशी तिची ओळख आहे.

शिवालीने काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये स्वत:चं घर घेतलं. तिने स्वकष्टाने आईवडिलांचं हे स्वप्न पूर्ण केलं.

शिवालीने कुटुंबासोबत नवीन घरातील काही फोटो पोस्ट केले. यामध्ये तिचे आईवडील आणि बहीण दिसत आहे. तिच्या बहिणीचं नाव आहे स्नेहा परब (Sneha Parab).

स्नेहाही शिवालीसारखीच दिसायला खूप सुंदर आहे. दोघी बहि‍णी एकमेकींच्या खूप जवळ आहेत हे त्यांच्या बाँडवरुन दिसून येतंच.

स्नेहाने नुकतंच खास फोटोशूट केलंय जे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. क्रीम रंगाची साडी तिने परिधान केली आहे. तसंच या साडीसोबतचा ब्लाऊजही खूपच स्टायलिश आहे.

मोकळे केस, नाकात नख, कपाळी चंद्रकोर असा तिचा सुंदर लूक बघायला मिळतोय. यात स्नेहाने कातील पोज दिल्या आहेत.

एका फोटोत तिने केसात फूल लावलं आहे. यात तिचं दिलखुलास हास्य प्रेमातच पाडणारं आहे. काही फोटोंमध्ये तर ती अगदी शिवालीसारखीच दिसते असा भास होतो.

स्नेहाचेही सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. स्नेहाच्या अदांवर चाहतेही फिदा आहेत.