कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:57 IST2025-06-28T11:51:13+5:302025-06-28T11:57:50+5:30
Shefali Jariwala Death : ५ वर्षांतच मोडला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...; कोण आहे शेफाली जरीवालाचा पती?

बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी(२७ जून) निधन झालं आहे. ती फक्त ४२ वर्षांची होती.
तिच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
शेफाली जरीवाला हिला काटा लगा मधून प्रसिद्धी मिळाली होती. अभिनेत्रीने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
शेफाली तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती. तिने २०१४ मध्ये पराग त्यागीशी लग्न केलं होतं. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता.
परागशी लग्न करण्याआधी शेफालीने मीट ब्रदर्सच्या हरमीत सिंह याच्याशी संसार थाटला होता. २००४ मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र ५ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला आणि २००९मध्ये त्यांचं लग्न मोडलं.
त्यानंतर एकट्या पडलेल्या शेफालीला परागने सांभाळलं. त्यांची भेट एका मित्रामुळे झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
परागदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. पवित्र रिश्ता, ब्रह्मराक्षस, जोधा अकबर, कलश यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.
तर काही बॉलिवूड सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. काही वेब सीरिजमध्येही तो झळकला होता.
पराग आणि शेफाली हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल होते. अनेकदा ते त्यांचे रोमँटिक फोटोही शेअर करायचे.
शेफालीच्या अचानक झालेल्या निधनाने परागला मोठा धक्का बसला आहे.