बाळाच्या जन्मानंतर तिला आत्महत्या करायची होती, कारण…; 'कहानी घर घर की' फेम अभिनेत्रीबाबत मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 15:25 IST2023-04-25T15:21:08+5:302023-04-25T15:25:29+5:30
या अभिनेत्रीने २०१२ मध्ये तिच्या पहिल्या लेकीला जन्म दिला होता. त्यानंतर पाच वर्षे ती पोस्टपॉर्टम डिप्रेशनमध्ये होती.

अभिनेत्री आणि पॉप गायिका इला अरुण यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत प्रसूतीनंतरच्या नैराश्यावर भाष्य केले. इला अरुण यांनी सांगितले की, त्यांना सात बहिणी आहेत आणि त्यांच्या आईची नेहमीच साथ लाभली आहे.
इला म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी महिलांना मूल झाल्यानंतर कुटुंबासोबत राहायला पाठवले जायचे, जेणेकरून त्यांना आधार मिळावा, पण आता कुटुंब लहान झाले आहे, त्यामुळे नैराश्य येणे अपरिहार्य आहे.
इला अरुण यांनी 'कहानी घर घर की'मधील अभिनेत्री श्वेता क्वात्रा हिच्याबाबत धक्कादायक खुलासा केला. त्या म्हणाल्या की, त्यांची एक मैत्रीण श्वेता क्वात्रा, पाच वर्षांपासून या नैराश्यातून गेली आहे, ती आत्महत्या करायलाही तयार होती. आता तिने तिच्या समस्येवर नियंत्रण मिळवले आहे आणि आज ती अशा परिस्थितीत आहे की ती अनेक नवीन मातांना सल्ला देऊ शकते...'
श्वेता क्वात्राने या वर्षी जानेवारीमध्ये हिंदुस्तान टाईम्सला एक मुलाखत दिली होती जिथे तिने सांगितले होते की ती आता पडद्यावर दिसत नाही कारण ती बऱ्याच काळापासून डिप्रेशनने ग्रस्त होती.
अभिनेत्रीने असेही सांगितले होते की प्रेग्नेंसीनंतर तिचे वजन ३० किलोने वाढले होते, त्यानंतर तिने बालवीर सीरियलमध्ये काम केले कारण तिचा आत्मविश्वास पूर्णपणे गेला होता, परंतु या शोने तिचा आत्मविश्वास परत दिला.
तसेच श्वेता म्हणाली होती की, मला कळायचं नाही की मला नक्की काय होतंय. मला पॅनिक अटॅक येऊ लागले होते.
मला विनाकारण राग यायचा. मला असहाय्य वाटायचे, माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागले होते, इतकी निराशाजनक परिस्थिती होती.
श्वेता क्वात्रा आतापर्यंत ‘कहानी घर-घर की’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘कुमकुम : एक प्यारा सा बंधन’ तसेच ‘कर ले तू भी मोहब्बत’ या मालिकांमध्ये झळकली आहे.