PHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 19:15 IST2021-05-17T18:57:02+5:302021-05-17T19:15:58+5:30
Tu Saubhagyavati Ho : दीक्षा केतकर ख-या आयुष्यात आहे बिनधास्त आणि स्टायलिश. 'या' अभिनेत्याची आहे बहीण

‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेतील ऐश्वर्या सध्या घराघरात पोहोचलीये. तिच्या हस-या आणि गोडे चेह-याने सगळ्यांनाच वेड लावले.
आता ही ऐश्वर्या कोण तर अभिनेत्री दीक्षा केतकऱ बोलक्या डोळ्यांची, गोड चेह-याची दीक्षा सध्या या मालिकेमुळे जाम चर्चेत आहे.
किशोरवयीन ऐश्वर्याचं तीन मुलांचा बाप असलेल्या गृहस्थाशी कसं लग्न ठरतं, ऐश्वर्या जाधव घराण्याची सून म्हणून शोभून दिसते का, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. पण ही ऐश्वर्या ख-या आयुष्यात फारच ग्लॅमरस आहे.
होय, तिचे ग्लॅमरस फोटो पाहून क्षणभर तुम्हीही थक्क व्हाल. हीच का ती ऐश्वर्या? असा प्रश्न तुम्हाला पडेल.
या दीक्षाची आणखी एक ओळख आहे. होय, तुमच्या आमच्या एका लाडक्या अभिनेत्याची ही बहीण.
हा अभिनेता कोण हे तुम्ही ओळखलंच असणार. होय, शशांक केतकर. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमधून जबरदस्त लोकप्रिय झालेल्या शशांकची दीक्षा ही धाकटी बहीण.
दीक्षाची ‘तू सौभाग्यवती हो’ ही पहिलीच मालिका आहे. पण पहिल्याच मालिकेतील तिच्या अभिनयावर चाहते फिदा आहेत.
दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत.
वयानी खूप मोठ्या असणा-या व्यक्तीबरोबर ऐश्वर्या का लग्न करते आणि जाधव घराण्याची सून कशी होते, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे.
दीक्षा केतकरने बालकलाकार म्हणून काही नाटकांमध्ये काम केलं आहे. या भूमिकांसाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत. तिने न्यूयॉर्कला जाऊन अभिनयाचे रितसर प्रशिक्षणही घेतले आहे. धूसर या मराठी सिनेमातही तिने काम केलं आहे.