सावंतवाडीचा पॅलेस अन् 'देवमाणूस'च्या लग्नाचा थाट, किरण-वैष्णवीच्या शाही विवाह सोहळ्याचे पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:41 IST2024-12-17T11:30:49+5:302024-12-17T11:41:48+5:30
Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding Photos: 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड आणि 'तू चाल पुढं' फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर नुकतेच लग्नबेडीत अडकले आहेत.

'देवमाणूस' मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाडने नुकतीच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.
किरण आणि वैष्णवी यांनी १४ डिसेंबर, २०२४ रोजी सावंतवाडी पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे.
किरण-वैष्णवीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
किरण-वैष्णवीच्या लग्नाला मराठी मालिका विश्वातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. त्यांनी या लग्नात चांगलीच धमालमस्ती केली.
किरण आणि वैष्णवी लग्नात खूपच सुंदर दिसत होते. दोघांनीही हटके पोषाख निवडला होता.
वैष्णवीने लग्नासाठी जांभळ्या रंगाची नववारी नेसली होती तर किरण पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
१३ डिसेंबर रोजी किरण-वैष्णवीचा सकाळी साखरपुडा झाला. त्यानंतर हळद आणि रात्री संगीत सेरेमनी पार पडले.
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरची पहिली भेट 'देवमाणूस' या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
किरणने मालिकेसोबत सिनेमातही काम केले आहे. तर वैष्णवीने मालिकेत काम केले आहे. सध्या ती तिकळी मालिकेत काम करते आहे.