कित्येकांनी साकारला श्रीकृष्ण! पण भाव खाऊन गेला 'हा' अभिनेता; लाखोंमध्ये घेतलेलं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:41 IST2025-08-16T15:36:40+5:302025-08-16T15:41:48+5:30

दरवर्षी गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पडद्यावरही अनेक कलाकारांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली.

दरवर्षी गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पडद्यावरही अनेक कलाकारांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली.

१९८० साली टीव्हीवर अधिराज्य गाजवलेल्या 'महाभारत' या पौराणिक मालिकेत अभिनेता नितिश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. या एका एपिसोडसाठी ते ३००० रुपये मानधन घ्यायचे.

रामानंद सागर यांच्या 'श्रीकृष्णा' मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशीने बालकृष्णाची भूमिका साकारली होती. यासाठी स्वप्निल ८५०० रुपये मानधन घ्यायचा. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.

तर याच मालिकेत अभिनेता सर्वदामन बॅनर्जी यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. ते एका एपिसोडसाठी १० हजार रुपये फी घ्यायचे.

'राधा कृष्ण' ही श्रीकृष्णावर आधारित असलेली टीव्ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत अभिनेता सुमेध मुडगलकरने कृष्णाची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी तो तब्बल ६५ हजार रुपये मानधन घ्यायचा.

अभिनेता सौरभ जैनने स्टार प्लसवरील 'महाभारता'त श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. या सगळ्या कलाकारांमध्ये सौरभ जैनने साकारलेला श्रीकृष्णाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

आजही त्याचे मालिकेतील व्हिडीओ व्हायरल होतात. मानधनाच्या बाबतीतही सौरभ वरचढ ठरला. एका एपिसोडसाठी त्याने २.५ लाख रुपये घेतले होते.