संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:14 IST2026-03-13T10:53:30+5:302026-03-13T11:14:43+5:30
संकेत पाठक हा 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी आहे. संकेतने पहिल्याच आठवड्यात चांगला खेळ खेळून रितेश देशमुखकडून वाहवा मिळवली. पण लग्न झाल्याची गोष्ट संकेतने घरातल्यांपासून लपवून ठेवली

संकेत पाठक हा 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी आहे. संकेतने पहिल्याच आठवड्यात चांगला खेळ खेळून रितेश देशमुखकडून वाहवा मिळवली

संकेत पाठक सध्या त्याच्या हुशारीने 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात सर्वांवर प्रभाव पाडतोय. संकेतचं लग्न झालं असूनही त्याने घरात लग्नाबद्दल कोणाला काहीच सांगितलं नाही. यामुळे सदस्यांनी त्याला धारेवर धरलं होतं.

संकेतचं रिअल लाईफमध्ये अभिनेत्री सुपर्णा श्यामसोबत लग्न झालंय. संकेतची पत्नी सुपर्णाला नेटकऱ्यांनी याबद्दल प्रश्न विचारला असता तिने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

सुपर्णाला एका नेटकऱ्याने विचारलं की, सर्वांना माहित असून पण त्याने लग्न झालं हे सर्वांपासून का लपवलं? यावर सुपर्णाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

सुपर्णा या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाला, ''त्याने लपवलं नाही. फक्त या विषयावर बोलणार नाही हे त्याने ठरवलंय.'', अशाप्रकारे सुपर्णाने संकेतची बाजू घेतली.

संकेत आणि सुपर्णा ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्या दोघांचे रिल व्हिडीओही चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

संकेत आणि सुपर्णा या दोघांचं लव्ह मॅरेज असून मालिकेच्या सेटवर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात असलेल्या संकेतला सुपर्णा पाठिंबा देत आहे.

















