Sanjeeda Shaikh B'day Spl: बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ही टक्कर देते टीव्हीवरील ही अभिनेत्री, पर्सनल लाईफमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:13 AM2021-12-20T11:13:19+5:302021-12-20T12:24:21+5:30

'निमो' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली संजीदा शेख (Sanjeeda Sheikh) टीव्हीवरील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. संजीदाच्या अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची देखील चर्चा असते. (Photo Instagram)

संजीदा आज आपला 37 वा वाढदिवस (Sanjeeda Sheikh 37th Birthday) साजरा करते आहे. संजीदाचा जन्म 1984 साली झाली, संजीदा तिच्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफला घेऊनच जास्त चर्चेत राहिली. (Photo Instagram)

संजीदा शेख (Sanjeeda Sheikh) गुजरातमधील अहमदाबादची राहणारी आहे. संजीदाने 2006 मध्ये 'क्या होगा निम्मो का' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. लोकांना घरोघरी निम्मो आवडली आणि ही मालिका सुपरहिट ठरली.(Photo Instagram)

संजीदाने इंडस्ट्रीत आल्यानंतरचआपले शिक्षण पूर्ण केले आहे. (Photo Instagram)

ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे.(Photo Instagram)

'कयामत' नंतर, संजीदाने २००७ साली नच बलिए ३ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड अभिनेता आमिर अलीसोबत दिसली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आणि दोघांनी त्यांच्या डान्स आणि केमिस्ट्रीमुळे शो जिंकला. (Photo Instagram)

जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केले. लग्नानंतर दोघांना एक मुलगी झाली. पण लग्नाच्या 8 वर्षानंतर त्यांच्या प्रेमात दुरावा निर्माण झाला. जेव्हा संजीदा लंडनवरुन शूटिंगवरून परतली आणि तिच्या आईच्या घरी गेली तेव्हा दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या. (Photo Instagram)

2003 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या बागबान या चित्रपटात संजीदा दिसली होती. या चित्रपटात तिने मायलीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

याशिवाय संजीदा नुकतीच नेटफ्लिक्सच्या कली कुही या चित्रपटात दिसली होती. (Photo Instagram)