मराठमोळी 'बोल्ड' अभिनेत्री, एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस; ओळखलं का? फोटो पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:46 IST2025-10-06T13:37:01+5:302025-10-06T13:46:14+5:30

अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं चाहत्यांना प्रेमात पाडलंय.

सध्या आपल्या बोल्ड फोटोंनी एका अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठी मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारणारी ही अभिनेत्री फारच सुंदर आहे.

एकेकाळी मुंबईतील चाळीमध्ये राहून तिने अत्यंत साधे दिवस काढले आहेत. आज ती तिच्या स्टायलिश लाईफमुळे नेहमी चर्चेत असते.

ही अभिनेत्री आहे रुचिरा जाधव (Ruchira Jadhav ). 'बिग बॉस मराठी' आणि विविध मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या रुचिराच्या नव्या फोटोशूटनं चाहत्यांना प्रेमात पाडलंय.

रुचिरा जाधव हिचा अभिनयासोबतच फॅशन सेन्स तगडा आहे. तिने केलेलं हे फोटोशूट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या फोटोशूटमध्ये तिचा मॉडर्न, स्टायलिश आणि अत्यंत कॉन्फिडंट अंदाज दिसून येतोय. या फोटोंमधून रुचिरानं तिची टोन्ड, स्लिम अँड ट्रिम फिगर फ्लॉन्ट केली आहे.

या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "जर मी तुमच्याकडे लक्ष देत असेन तर स्वतःला धन्य समज. कारण, माझा खरा छंद म्हणजे लोकांकडे दुर्लक्ष करणे आहे".

रुचिरा जाधवने आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती 'बिग बॉस मराठी' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको'मधून प्रसिद्धीझोतात आली होती.

तर अलिकडेच अभिनेत्री 'स्टार प्रवाह'वरील 'तू ही रे माझा मितवा'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळाली.

एका मुलाखतीत रुचिराने तिच्या कुटुंबाचा संघर्ष, बालपणातील आठवणी आणि शिक्षणावरील तिची आवड याबद्दल सांगितलं होतं. रुचिरा जाधव ही मुंबईतील भांडुपमधील लहानाची मोठी झाली.

रुचिरा जाधव ही केवळ अभिनयातच नव्हे, तर शिक्षणातसुद्धा तितकीच हुशार आहे. तिने B.Sc आणि M.Sc दोन्ही पदव्या पूर्ण केल्या असून, नंतर थिएटरकडे वळत अभिनयात करिअर घडवलं.