'रात्रीस खेळ चाले' फेम लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल
By देवेंद्र जाधव | Updated: June 2, 2025 12:21 IST2025-06-02T11:52:48+5:302025-06-02T12:21:55+5:30
रात्रीस खेळ चाले मालिकेत वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत झळकलेली आणि सध्या मराठी मालिकाविश्वात सक्रीय असलेली लोकप्रिय अभिनेत्री आई होणार आहे. तिचे डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

एक मराठी अभिनेत्री आई होणार आहे. या अभिनेत्रीला आपण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. या अभिनेत्रीचं नाव आहे मंगल राणे
अभिनेत्री मंगल राणेने सोशल मीडियावर डोहाळेजेवणाचे फोटो शेअर केले आहेत. मंगलसोबत तिचा पती संतोष पेडणेकर पाहायला मिळतो.
डोहाळेजेवणाच्या प्रसंगी मंगलचे अनेकांनी लाड केेले. याशिवाय गोडधोड भरवून तिचं कौतुक केलं.
मंगलचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक या आनंदाच्या क्षणी तिच्यासोबत उपस्थित होते. मंगलने सर्वांसोबत फोटो काढून आनंद साजरा केला.
मंगलला आपण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत पाहिलंय. मंगलच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं
'रात्रीस खेळ चाले' मालिकेनंतर मंगलने 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा', 'संत गजानन शेगावीचे' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये अभिनय केला. याशिवाय काही नाटकांमधून आणि सिनेमांमधूनही मंगल झळकली.
मंगलचे पती संतोष पेडणेकर हे पेशाने फोटोग्राफर आहेत. २०२४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात मंगल आणि संतोष यांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर आता हे दोघे पहिल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.