रामायण व महाभारत सोबत या आहेत टीव्हीवरील टॉप पाच मालिका, लॉकडाउनमध्ये मिळतोय चांगला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 20:08 IST2020-05-08T20:08:50+5:302020-05-08T20:08:50+5:30

लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांनी दूरदर्शनवरील रामानंद सागर यांच्या रामायणला खूप चांगला रिस्पॉन्स दिला.
2020च्या 17 व्या आठवड्यातील रिपोर्टनुसार, उत्तर रामायणने शहर व ग्रामीण भागात नंबर वनवर होती. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलने 25 एप्रिल ते 1 मे पर्यंतचा रिपोर्ट जाहीर केला आहे.
महाभारत दुसऱ्या क्रमांकावर होते. टीआरपीमध्ये या दोन्ही मालिकांनी दुसऱ्या वाहिनीना मागे टाकले.
बाबा ऐसो वर ढुंढो ही दंगल वाहिनीवरील मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चौथ्या क्रमांकावर महिमा शनिदेव की ही मालिका आहे.
पाचव्या क्रमांकावर दंगल वाहिनीवर प्रसारीत होणारी रामायण मालिका आहे ज्यात रामच्या भूमिकेत गुरमीत चौधरी आहे.