गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:10 AM2024-03-22T10:10:58+5:302024-03-22T10:35:04+5:30

रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिमांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

3 एप्रिलपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे.सामान्य लोकांसह, अनेक सेलिब्रिटी देखील रमजानच्या संपूर्ण महिन्यात प्रार्थना करतात आणि उपवास करतात.

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान रमजानमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि हायड्रेशनसह निरोगी जीवनशैलीचे पालन करते.

हुमा कुरेशी आध्यात्मिक विकासावर भर देऊन संपूर्ण रमजानच्या महिन्यात उपवास करते.

टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमच्या घरात रमजानचा महिना एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. अभिनेत्यासोबतच त्याचं संपूर्ण कुटुंब कडक उपवास ठेवतात आणि पार्थनाही करतात.

मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान दरवर्षी रोजा करते. यावेळी तिने इंस्टाग्राम पोस्ट करून रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री दीपिका कक्कर देखील शोएब इब्राहिमशी लग्न केल्यापासून इस्लाम धर्माचे पालन करत आहे. दीपिका आता रमजान महिन्यातही उपवास करत.

सना खान सोशल मीडियावर तिच्या अध्यात्मिक प्रवासाविषयी वारंवार चर्चा करते. ती रमजानमध्ये दानधर्म करताना आणि उपवासाच्या महत्त्वावर भाष्य करताना दिसते.

बॉलिवूड अभिनेता साकिब सलीम उपवास करून कुराण पठण करतो.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेनाने गेल्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्माचं पालन करत असल्यापासून विवियनचा हा सहावा रमजान आहे आणि यावर्षीही तो रोजा करत आहे.

'अनुपमा' टीआरपीमध्ये नेहमीच टॉपवर आहे. या मालिकेत यशदीपची भूमिका साकारणारे अभिनेते वकार शेख हे रोजा ठेवतात. शूटिंगच्या वेळी कधी-कधी उपवास ठेवणे कठीण जाते. पण काम आणि रमजान या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, असे ते म्हणाले.