त्याच्यापेक्षा १८ वर्षाने लहान आहे राहुल महाजनची तिसरी पत्नी, पत्नीबाबत केला हा खुलासा.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 11:20 AM2020-12-07T11:20:55+5:302020-12-07T11:34:14+5:30

मुलाखतीदरम्यान राहुल म्हणाला की, आम्ही रेल्वे ट्रॅकसारखे आहोत. एकमेकांच्या गोष्टींमध्ये जास्त लुडबुड करत नाहीत. एकमेकांना स्पेस देतो. आम्ही एक बॅलन्स करून चालतो जेणेकरून आमचं लग्न योग्य ट्रॅकवर चालावं.

बिग बॉसमधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक असलेला राहुल महाजनने सीझन १४ मध्ये चॅलेंजच्या रूपात शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. राहुलचं पर्सनल लाइफ तेव्हाही फार चर्चेत होतं आणि आताही आहे. राहुलने तीन लग्ने केली. त्यातील त्याच्या दोन पत्नी श्वेता सिंह आणि डिंपी गांगुलीने त्याच्यावर कौंटुबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. इतकेच नाही तर राहुल ड्रग्स स्कॅंडलमध्येही अडकला होता. राहुल आता आध्यात्माकडे वळला आहे. त्याने तिसरं लग्न नतालिया इलिना नावाच्या रशियन मुलीसोबत केलं. नतालिया ही कजाकिस्तानची राहणारी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने तिच्याबाबत सांगितलं आहे.

मुलाखतीदरम्यान राहुल म्हणाला की, आम्ही रेल्वे ट्रॅकसारखे आहोत. एकमेकांच्या गोष्टींमध्ये जास्त लुडबुड करत नाहीत. एकमेकांना स्पेस देतो. आम्ही एक बॅलन्स करून चालतो जेणेकरून आमचं लग्न योग्य ट्रॅकवर चालावं.

राहुल म्हणाला की, ती रशियन आहे पण तिने आता हिंदू धर्मा स्वीकारला आहे. मी तिला नेहमीच भगवान शिव आणि पार्वतीचं उदाहरण देत असतो. मी सांगत असतो की, पती-पत्नीचं नातं शिव-पार्वतीसारखं असलं पाहिजे.

इतकेच नाही तर नतालियाला मी भगवद गीता ऐकवतो आणि आम्ही सोबत अनेक धार्मिक पुस्तके वाचतो. मला वाटतं की, आपल्याला एक योग्य जोडीदार आणि चांगला परिवार शोधण्यासाठी एका चांगल्या भाग्याची गरज असते.

बिग बॉसच्या घरात येण्यााबाबत विचारले असता म्हणाला की, मी नतालियासोबत आनंदी जीवन जगत आहे. त्यामुळे मी बिग बॉसच्या घरातील महिलांपासून दूरच राहणार. मी आधीच लिंकअप केलं आहे आणि आता घरात कुणासोबतही फेक फ्रेन्डशिप करणार नाही.

दरम्यान, राहुलने पहिलं लग्न त्याची बालपणीची मैत्रीण श्वेता सिंहसोबत केलं होतं. दोघांचं लग्न २००६ मध्ये झालं होतं. दुसरं लग्न राहुलने डिंम्पी गांगुलीसोबत २०१० मध्ये केलं होतं. पण तीन वर्षात म्हणजे २०१३ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर डिंपीने २०१५ मध्ये रोहित रॉयसोबत दुसरं लग्न केलं.

राहुलही पहिली पत्नी श्वेता सिंह होती. लग्नानंतर सतत दोघांमध्ये भांडण होत होती. श्वेताने राहुलवर शारीरिक शोषणाचाही आरोप लावला होता. श्वेता ही राहुलची बालपणीची मैत्रीण होती. दोघेही अमेरिकेत फ्लाइंग स्कूलपासून सोबत शिकले.

तिसरी पत्नी नतालिया राहुल महाजनपेक्षा १८ वर्षांनी लहान आहे. २०१८ मध्ये त्यांनी एका छोटेखानी सोहळ्यात लग्न केले. या लग्नाला केवळ दोघांच्या परिवारातील लोकच उपस्थित होते.

Read in English