प्रियदर्शिनी-सिद्धार्थचं रोमँटिक फोटोशूट पाहून चाहते घायाळ; म्हणाले, "यांची एक लव्हस्टोरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:33 IST2025-09-10T15:18:31+5:302025-09-10T15:33:33+5:30
'हास्यजत्रा', 'फुलराणी' आणि आता 'दशावतार'मधून प्रियदर्शिनी चाहत्यांच्या भेटीला, सिद्धार्थ मेननसोबत जमली जोडी

मराठी सिनेविश्वात सध्या 'दशावतार' सिनेमाची चर्चा आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, सुनील तावडे अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे
कोकणातील दशावतार या लोककलेवर एक गूढ कथा बनवण्यात आली आहे. यावरच सिनेमा आधारित आहे. दरम्यान सिनेमातील सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनीच्या रोमँटिक केमिस्ट्रीने लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रियदर्शिनी इंदलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे प्रसिद्धीझोतात आली. सुबोध भावेने तिला 'फुलराणी' सिनेमातून मोठा ब्रेक दिला. नंतर ती आणखी काही सिनेमांमध्ये दिसली. आता दशावतार सिनेमात तिची मुख्य भूमिका आहे.
तर मूळचा केरळचा असलेला सिद्धार्थ मेनन याआधीही अनेक मराठी सिनेमांमध्ये दिसला आहे. 'राजवाडे अँड सन्स','जून' हे त्यापैकीच सिनेमे. गुड लूक आणि अभिनयाने त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे.
दशावतार या सिनेमात प्रियदर्शिनी आणि सिद्धार्थची जोडी जमली आहे. दोघांवर 'ऋतुचक्र' हे रोमँटिक गाणंही शूट झालं आहे. यातील त्यांची केमिस्ट्री तरुणाईच्या पसंतीस पडली आहे.
सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने दोघांचं एक सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर समोर आलं. सिद्धार्थच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रियदर्शिनी बसली आहे.
गुलाबी साडीत प्रियदर्शिनी खूप सुंदर दिसत आहे. तर सिद्धार्थ कॅज्युअल लूकमध्ये डॅशिंग दिसतोय. त्यांचे हे फोटो पाहून दोघांचा एक वेगळा लव्हस्टोरी सिनेमा यावा अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
प्रियदर्शिनी आणि सिद्धार्थच्या कँडीड फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये. दशावतार सिनेमात त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.