पृथ्वीक प्रतापचा वाघासोबत सेल्फी, कुटुंबासोबत राणीबागेतील भटकंतीचे फोटो शेअर करत म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:26 IST2025-07-23T11:52:59+5:302025-07-23T12:26:27+5:30

मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रतापने नुकतीच राणीच्या बागेला भेट दिली असून तिथे खास फोटोशूट केलंय.

लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो चर्चेत असतो.

पृथ्वीक प्रताप वेळात वेळ काढून सध्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. नुकतीच पृथ्वीकने मुंबईतील राणीच्या बागेला (Prithvik Pratap Visited Mumbai Ranibaug ) भेट दिली.

या सफारीदरम्यान पृथ्वीकने आपल्या पत्नी आणि कुटुंबासह वेळ घालवत, अनेक सुंदर क्षण टिपले.

पृथ्वीकनं राणीबागेतील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो कुटुंबासोबत तिथे मजा-मस्ती करताना दिसला.

राणीबागेतील बंद काचेआड असलेल्या वाघासोबत एक सेल्फी घेतली. हा सेल्फी विशेष लक्ष वेधून घेत आहे.

राणीबागेतील फोटो शेअर करत पृथ्वीक म्हणाला, "जाईच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी मला राणीबाग म्हणजेच 'वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला' भेट देता आली.

बऱ्याच वर्षांनंतर राणीबागेत परतल्यावर पृथ्वीकच्या आठवणी जाग्या झाल्या. तो म्हणाला, "आम्ही संपूर्ण कुटूंब या सफारीसाठी गेलो होतो. खरं तर... मी खूप लहान असताना राणीच्या बागेत आलो होतो पण, आज इतक्या वर्षांनी परत आल्यानंतर हे ठिकाण मला खूप बदललेलं जाणवतंय".

पुढे तो म्हणाला, "मुंबईच्या धावपळीच्या जीवनात, गोंगाटात शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर राणीबाग हे खरचं उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण फक्त लहान मुलांसाठीचं नाही आहे. तर तुम्हाला निसर्ग, प्राणी, झाडं यांच्याविषयीची योग्य माहिती हवी असल्यास ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल.. इथे वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी, पक्षी, तसेच पेंग्विन्स सुद्धा पाहायला मिळतात".

पृथ्वीक म्हणाला, "या सफारीच्या वेळी मी सुद्धा थोडा लहान झालो छान बागडलो, जाई आणि आम्ही सर्वानी मजा केली. तो दिवस एन्जॉय केला. एक दिवस छान मोकळा वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत ह्या ठिकाणी नक्की भेट द्या मजा येईल".

पृथ्वीकनं शेअर केलेले हे राणीबागेतील फोटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.