PICS : 41 व्या वर्षी आई होणार ही अभिनेत्री, शेअर केले मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 17:03 IST2021-08-18T16:50:35+5:302021-08-18T17:03:49+5:30
बिग बॉस 9 मधील हे सेलिब्रिटी कपल लवकरच आई-बाबा होणार आहे.

बिग बॉस 9 मधील कपल किश्वर मर्चंट आणि सुयश राय हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. टीव्हीवरचे लोकप्रिय कपल किश्वर मर्चंट व सुयश राय यांच्यात 8 वर्षांचे अंतर आहे. किश्वर सुयशपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे.
पण सध्या चर्चा आहे ती तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटची. बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो किश्वरने शेअर केले आहेत.
व्हाईट बॉडीसूट, ब्राऊन जॅकेट आणि हॅट अशा लुकमध्ये किश्वरने हे फोटोशूट केले आहे.
याच महिन्यात किश्वर बाळाला जन्म देणार आहे. किश्वर व सुयश दोघेही आतुरतेने बाळाच्या जन्माची प्रतीक्षा करत आहेत.
किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांचे 2016 मध्ये लग्न झाले.
2011 मध्ये प्यार की ये एक कहानी शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली.
किश्वर व सुयश दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत.
किश्वरने एक हसीना थी, इतना करो न मुझसे प्यार, देश में निकला होगा चांद, काव्यांजली अशा लोकप्रिय मालिकेत काम केले आहे.
किश्वरने एक हसीना थी, इतना करो न मुझसे प्यार, देश में निकला होगा चांद, काव्यांजली अशा लोकप्रिय मालिकेत काम केले आहे.