Prajakta Mali: स्वत:चं फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड अन्...; प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:22 IST2025-07-15T16:54:40+5:302025-07-15T17:22:10+5:30
प्राजक्ता माळीने एवढ्या कमी वयात गाठलं मोठं यश

नंतर प्राजक्ता मराठी सिनेमांमध्ये झळकली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची सूत्रसंचालिकाही झाली. या कार्यक्रमाने तर तिला विशेष ओळख दिली.
दिसायला गोड, सोज्वळ अशी प्राजक्ता माळी (Prajakta Mali) दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेत ती अगदीच सालस, सुंदर दिसली होती.
प्राजक्ताने मुंबईत स्वत:चं हक्काचं घरही घेतलं. काही दिवसांपूर्वीच या घरात १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिने सेलीब्रेशन केलं होतं.
२०२० साली प्राजक्ताने 'शिवोहम' स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं. आपल्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तिने 'फुलवंती' या पहिल्या सिनेमाची निर्मिती केली. यात तिने स्वत: मुख्य भूमिका साकारली. यासाठी तिचं खूप कौतुक झालं.
प्राजक्ताला पारंपरिक दागदागिन्यांची खूप आवड आहे. म्हणूनच तिने २०२३ साली स्वत:चा 'प्राजक्तराज' हा दागिन्यांचा ब्रँड सुरु केला. यामार्फत तिने म्हाळसा, सोनसळा, तुळजा यांसारखे पारंपरिक दागिन्यांना पुन्हा नवी ओळख दिली.
त्याचवर्षी प्राजक्ताने कर्जतमध्ये आलिशान फार्म हाऊस खरेदी केलं. 'प्राजक्तकुंज' असं याला नाव दिलं. हास्यजत्रेच्या टीमने अनेकदा प्राजक्ताच्या फार्महाऊसवर जाऊन मजा मस्ती केली आहे. पर्यटकही या फार्म हाऊसवर बुकिंग करुन जाऊ शकतं.
यासोबत प्राजक्ता सिनेमांमध्येही काम करतच आहे. एका सिनेमासाठी ती १५-२० लाख रुपये घेते अशी चर्चा आहे. तसंच ती आर्ट ऑफ लिव्हिंगशीही जोडलेली आहे.
वयाच्या ३५ व्या वर्षी प्राजक्ताचा इतका सगळा व्याप पाहता तिची नेटवर्थही तगडी आहे. २०२२ मध्ये तिची संपत्ती ४० कोटी होती. आता तीन वर्षात यात आणखी वाढ झाली आहे.