Nikki Tamboli : "आपल्याच माणसांनी दिली नाही साथ, वडील अभिनयाच्या विरोधात", निक्कीने सांगितला स्ट्रगल काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:13 IST2025-02-27T16:53:52+5:302025-02-27T17:13:17+5:30
Nikki Tamboli : एका लेटेस्ट मुलाखतीत निक्कीने तिच्या स्ट्रगलशी संबंधित किस्सा शेअर केला आहे.

अभिनेत्री निक्की तांबोळी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या कुकिंग रिएलिटी शोमध्ये दिसत आहे. एका लेटेस्ट मुलाखतीत निक्कीने तिच्या स्ट्रगलशी संबंधित किस्सा शेअर केला आहे.
निक्की म्हणाली, "मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंतचा माझा प्रवास अद्भुत राहिला आहे. लोकांनी याबद्दलही चर्चा केली. अखेर मी या इंडस्ट्रीत माझं नाव कमावलं आहे."
"पण कुठेतरी माझ्या स्वतःच्या लोकांनी माझ्याकडे पाठ फिरवली, विशेषतः माझ्या वडिलांनी. सुरुवातीला माझे वडील माझ्या अभिनयाच्या निर्णयाच्या विरोधात होते."
"मी शोबिझमध्ये जावं असं त्यांना वाटत नव्हतं, मी त्यांचं ऐकलं नाही. मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग केला."
"माझे वडील नेहमीच माझ्यासाठी सुपरहिरो राहिले आहेत, पण जेव्हा तुमचा सुपरहिरो तुमच्या आयुष्यातून निघून जातो तेव्हा असं वाटतं की एखाद्या पक्ष्याचे पंख कापले गेले आहेत."
"ही जगातील सर्वात वाईट भावना आहे. मी नेहमीच माझ्या वडिलांकडून कौतुकाची वाट पाहत आहे."
"मला माझ्या वडिलांनी मला सांगावं की निक्की, तू जे काही केलं आहेस त्याचा मला अभिमान आहे."
"सेलिब्रिटी मास्टरशेफवर मी जे काही बनवत आहे, ते मी माझ्या कुटुंबासाठी बनवेन. मला वाटतं की, माझं आणि माझ्या वडिलांमधील कनेक्शन पुन्हा झालं पाहिजे."
"जेव्हा ते मला टीव्हीवर पाहतील तेव्हा त्यांना वाटेल की त्यांची निक्की परत आली आहे.
"ही तीच निक्की आहे जिला मी चुलीवर स्वयंपाक करायला शिकवलं होतं. म्हणूनच मी या शोचा भाग झाले आहे" असं निक्कीने सांगितलं.
निक्की तांबोळीचे असंख्य चाहते आहेत. ती हिंदी आणि मराठी बिगबॉसमध्ये सहभागी झाली होती.