'या' अभिनेत्याने ५० पेक्षा जास्त वेळा केलंय लग्न? म्हणाला "भांगेत कुंकू भरून थकलोय, आता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:50 IST2025-08-18T18:22:54+5:302025-08-18T18:50:52+5:30
एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याने लग्नाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता नमिश तनेजा ( Namish Taneja) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नमिश तनेजाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलंय. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
'स्वरागिनी', 'विद्या', 'मैत्री', 'मैं मायके चली जाऊंगी', 'ऐ मेरे हमसफर', 'इक्यावन', 'एक नयी पेहचान', 'प्यार तुने क्या किया', 'ससुराल सिमर का' या मालिकांमध्ये नमिशने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
तो ३० वर्षांचा आहे पण अजूनही अविवाहित आहे. नुकतंच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नमिशने लग्नाबद्दल खुलासा केलाय.
नमिश गेल्या १३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आंचल आहे.
लग्नाबद्दल बोलताना अभिनेत्याने सांगितले की, त्याची लग्न करण्याची इच्छा नाही. कारण त्याने पडद्यावर ५० हून अधिक वेळा लग्न केले आहे.
अभिनेता म्हणाला, "मालिकेच्या शुटिंगमध्ये मी इतक्या वेळा सहकलाकार अभिनेत्रींच्या भांगेत कुंकू भरलंय की मी आता थकलो आहे. माझ्या इतक्या बायका आहेत. मी १३ वर्षांपासून आंचलसोबत आहे. पण लग्न करण्याची इच्छा कधीच झाली नाही. कारण मी पडद्यावर इतक्या वेळा लग्न केले आहे".
नमिश तनेजा हा मुळचा दिल्लीचा रहिवासी आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला आहे.