प्रसिद्ध संगीतकाराचा मुलगा आहे 'हा' अभिनेता! 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत करतोय काम, तुम्हाला माहितीच नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:39 IST2026-03-30T16:22:44+5:302026-03-30T16:39:41+5:30
प्रसिद्ध संगीतकारांचा मुलगा आहे 'हा' अभिनेता; लोकप्रिय मालिकेत करतोय काम, कोण आहे तो?

मराठीत आजवर अनेक मालिका आल्या ज्या आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. छोट्या पडद्यावरील अशीच एक चर्चेत असणारी मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली.

या मालिकेतील बरेचसे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुमीत पुसावले तसेच मालिकेत सविता प्रभूणे, प्रतीक्षा मुणगेकर तसेच आशुतोष पत्की, ऋतुजा कुलकर्णी, आरोही सांभरे अशी तगडी स्टारकास्ट आहे.


मात्र, तुम्हाला माहितीये का? आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे अभिषेक आजही ओळखला जातो.

मराठी मालिकांचे शीर्षक गीत म्हणजे अशोक पत्की हे समीकरण अजूनही कायम आहे. अशोक पत्की यांचा वादक ते संगीतकार असा जवळजवळ 40 वर्षांचा त्यांचा प्रवास म्हणजे अतिशय मेहनतीने केलेली कलेची साधना आहे. आभाळमाया, गोटय़ा, वादळवाट, अवघाची हा संसार, मानसी, माझिया प्रियाला प्रीत कळेना अशा अनेक मालिकांची शीर्षकगीतं रसिकांच्या मनात कायम रेंगाळत ठेवली.

'मी सिंधू सपकाळ', 'मिशन चॅम्पियन', 'मुंबई आमची', 'नणंद भावजय', 'नवसाचा पोर', 'वन रूम किचन', 'पैजेचा विडा', 'प्रेम करू या खुल्लमखुल्ला', 'राणीने डाव जिंकला', 'आई शपथ, आई पाहिजे', 'राजाने वाजवला बाजा', 'रंगत संगत', 'रानी और जानी',' रेशीमगाठ',' सरदारी बेगम',' सत्त्वपरीक्षा'... अशा असंख्य चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक पत्की यांना अनन्य पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर स्मृतिपुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार, शब्दरत्न गौरव पुरस्कार, वसुंधरा पंडित स्मृति पुरस्कार, राम कदम पुरस्कार, झी. टीव्ही पुरस्कार, सह्याद्रीचा नवरत्न पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.

















