खऱ्या आयुष्यातही ग्लॅमरस आहे 'मुरांबा'मधील रेवा, स्विमिंगपूलमधील हॉट फोटोंनी वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:51 IST2024-10-21T17:46:38+5:302024-10-21T17:51:40+5:30
अभिनेत्री निशाणी बोरुलेही याच मालिकेतून घराघरात पोहोचली. मुरांबामध्ये निशाणी रेवा ही भूमिका साकारत आहे.

'मुरांबा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.
अभिनेत्री निशाणी बोरुलेही याच मालिकेतून घराघरात पोहोचली. मुरांबामध्ये निशाणी रेवा ही भूमिका साकारत आहे.
रेवा खऱ्या आयुष्यातदेखील तितकीच ग्लॅमरस आहे. नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
यामध्ये लाल रंगाच्या ड्रेसमध्ये निशाणीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. बॅकलेस ड्रेसमध्ये निशाणीचा हॉट लूक पाहायला मिळत आहे.
तिने स्विमिंगपूलमधील काही फोटोही शेअर केले आहेत. तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.
निशाणीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
निशाणी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.