कोणी म्हणतंय बार्बी गर्ल तर कोणी म्हणे अफगाणी गर्ल; अभिज्ञानाचा हटके लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:59 IST2024-01-30T15:54:17+5:302024-01-30T15:59:57+5:30
Abhidnya bhave: अभिज्ञाची हेअर स्टाइल सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave). उत्तम अभिनयासह मनमोकळ्या स्वभावामुळे अभिज्ञाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
'तू तेव्हा तशी' या मालिकेत झळकलेली अभिज्ञा सध्या एका हिंदी मालिकेत काम करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्येच तिने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.
अभिज्ञा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते.
बऱ्याचदा तिचे फोटोशूट, व्हिडीओशूटदेखील चर्चेत येत असतात. अलिकडेच तिने एक भन्नाट फोटोशूट केलं आहे. तिचं हे नवीन शूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.
अभिनेज्ञाने ब्लेझर आणि ट्राऊझर या आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे. सोबतच तिची हेअरस्टाइल सुद्धा बदलल्याचं दिसून येत आहे.
अभिज्ञाच्या या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. विशेष म्हणजे सेलिब्रिट सुद्धा तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
या फोटोंमध्ये अभिज्ञाचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसून येत आहे.
अभिज्ञाचे हे फोटो पाहिल्यावर काहींनी तिला बार्बी गर्ल म्हटलं आहे. तर काही जण तिला अफगाणी गर्ल सुद्धा म्हटलं आहे.