परदेशात मिताली मयेकरचा भलताच बोल्ड अंदाज, अभिनेत्रीने शेअर केले हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 14:36 IST2024-07-25T14:31:53+5:302024-07-25T14:36:15+5:30
मितालीने परदेशवारीचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

मिताली मयेकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फ्रेशर्स या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली.
अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मिताली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या मिताली आणि सिद्धार्थ परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.
मितालीने परदेशवारीचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
मितालीने डीप नेक टॉप परिधान केल्याचं दिसत आहे. फोटोसाठी तिने खास पोझही दिल्या आहेत.
याआधीही मितालीने बिकिनीमधील फोटो शेअर करत तिच्या बोल्ड अदा दाखवल्या होत्या.
मितालीचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
मिताली आणि सिद्धार्थ युरोपात फिरायला गेले आहेत. २३ दिवसांत त्यांनी तब्बल ४ देशांना भेटी दिल्या आहेत.