'काजळमाया'त चेटकीण, पण प्रत्यक्षात आहे भलतीच ग्लॅमरस; अभिनेत्रीचे फोटो पाहून प्रेमात पडाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:37 IST2025-09-25T16:22:00+5:302025-09-25T16:37:58+5:30
'काजळमाया' मालिकेत चेटकीणीच्या भूमिकेत दिसणारी ही नायिका खऱ्या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस; फोटो पाहून प्रेमात पडाल

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'काजळमाया' ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या बहुचर्चित मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकरसह एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'काजळमाया' मध्ये प्रेक्षकांना चेटकीणीच्या वंशातील विलक्षण सुंदर असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट पाहायला मिळणार आहे.
'काजळमाया' मालिकेतून अभिनेत्री रुची जाईल टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत ती चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
पडद्यावर पर्णिका नावाच्या चेटकीणीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते.
रुची सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्याद्वारे फोटो,व्हिडीओ शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून याची प्रचिती येईल.
येत्या २७ ऑक्टोबरपासून रुची जाईलची काजळमाया ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.