Navratri 2024: 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्री पूजा बिरारीचा मनमोहक अंदाज; फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 16:57 IST2024-10-05T16:44:30+5:302024-10-05T16:57:12+5:30
अभिनेत्री पूजा बिरारीने नुकतंच नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.

स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री पूजा बिरारी घराघरात पोहचली.
सध्या पूजा 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे. मालिकेतील राया आणि मंजिरीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.
अशातच अभिनेत्रीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राखाडी रंगाची नऊवारी साडी नेसून फोटोशूट केलं आहेत.
पूजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत.
नऊवारी साडी त्यावर खड्यांचे दागिने अभिनेत्रीचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना भावला आहे.
'स्टार प्रवाह' तसेच 'नवरात्री २०२४' असा टॅग देत पूजाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत नवरात्री स्पेशल फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसचा पाडला आहे.