'तुला जपणार आहे' मालिकेतील साधीभोळी मीरा खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:28 IST2025-08-08T17:05:07+5:302025-08-08T17:28:41+5:30

आरस्पानी सौंदर्य! 'तुला जपणार आहे' मालिकेतील मीरा खऱ्या आयुष्यात दिसते फारच वेगळी, पाहा फोटो

काही महिन्यांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर 'तुला जपणार आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.

या मालिकेत अभिनेता नीरज गोस्वामी आणि महिमा म्हात्रेची प्रमुख भूमिका आहे.

तसंच मालिकेत तनिष्का विशे, मिलिंग पाठक, निलेश रानडे, पौर्णिमा तळवळकर, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे अशी जबरदस्त स्टाकास्ट आहे.

अभिनेत्री महिमा म्हात्रेने 'तुला जपणार आहे' मध्ये साकारलेली साधी-भोळी मीरा प्रेक्षकांना भावली आहे.

परंतु, खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून कोणाचीही नजर हटणार नाही.

महिमा म्हात्रेने याआधी हिंदी मालिकाविश्व गाजवलं आहे. 'ऑंख मिचोली' मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली होती.

तसेच 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला', 'दार उघड बये' यांसारख्या मराठी मालिकांमध्येही ती झळकली आहे.