पडद्यावर साधी, सोज्वळ पण खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस दिसते सत्याची मीरा; फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:10 IST2026-03-17T14:18:39+5:302026-03-17T15:10:18+5:30

खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते 'साधी माणसं' मालिकेतील मीरा, फोटोंवरून हटणार नाही नजर

अभिनेत्री शिवानी बावकर या नावाचा कोणत्याही परिचयाची गरज नाही. आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि अल्बम सॉंगच्या माध्यमातून शिवानीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लागीरं झालं जी ही तिची पहिली मालिका होती. या मालिकेतीत तिने साकारलेली शितली आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

'लागीर झालं जी' या मालिकेनंतर शिवानी बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये झळकळी. परंतु, तिला पाहिजे तसं यश मिळालं नाही.

त्यानंतर तिने 'अल्पी पल्टी सुमडीत कल्टी', 'लवंगी मिरची' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'साधी माणसं' या मालिकेत मीरा नावाची भूमिका साकारते आहे. तर अभिनेता आकाश नालावडे सत्या नावाची भूमिका वठवतो आहे.

शिवानी तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे. तिच्या लूक्स आणि अभिनयामुळे तिचा मोठा चाहतावर्ग झाला आहे.

'साधी माणसं' मालिकेतील साधी, सोज्वळ आणि घरंदाज दिसणारी मीरा खऱ्या आयुष्यात खूपच मॉर्डन आहे.

अलिकडेच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६ पार पडला. या सोहळ्यात शिवानीने हा ग्लॅमरस लूक केला होता.

यावेळी तिने लाल रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. सध्या इंटरनेटवर तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहे. शिवानीच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.