"आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है...", अभिनेत्री पूर्णिमा डेचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:57 IST2024-12-24T17:53:05+5:302024-12-24T17:57:23+5:30
'कुन्या राजाची गं तू राणी', 'रात्रीस खेळ चाले' तसेच 'तुला पाहते रे' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री पूर्णिमा डे प्रसिद्धीझोतात आली.

पूर्णिमा डे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
अलिकडेच ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कुन्या राजाची गं तू राणी' या मालिकेत पाहायला मिळाली. दरम्यान, ही मालिका ऑफ एयर झाली आहे.
'कुन्या राजाची गं तू राणी' मालिकेत अभिनेत्रीने मृण्मयी नावाचं पात्र साकारलं होतं.
दरम्यान, पूर्णिमा इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. त्याद्वारे आपले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर ती पोस्ट करते.
नुकतंच अभिनेत्रीने तपकिरी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान करून फोटोशूट केलं आहे.
पूर्णिमाचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना फारच आवडले आहेत.
"Desi वातावरण..." असं कॅप्शन देत तिने हे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्याचे पाहायला मिळतायत.