'अस्मिता' मालिकेतील 'ही' चिमुकली आठवतेय? आता दिसते फारच सुंदर, लोकप्रिय मालिकेत साकारतेय खलनायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:46 IST2025-10-13T17:37:11+5:302025-10-13T17:46:36+5:30

'अस्मिता' मालिकेतील ही चिमुकली आता दिसते फारच सुंदर! ११ वर्षांत इतका बदलला लूक

छोट्या पडद्यावरील काही गाजलेल्या मालिकांपैकी एक नाव म्हणजे अस्मिता.

एकेकाळी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं.

या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री मयुरी वाघ मुख्य भूमिकेत होती. शिवाय योगेश सोहोनी, आदित्य देशपांडे तसेच अमृता देशमुख आणि सुलभा देशपांडे या कलाकारांच्याही भूमिका होत्या.

जवळपास ११ वर्षांपूर्वी आलेल्या मालिकेची आजही तितकीच चर्चा होताना दिसते. दरम्यान, या मालिकेत बालकलाकार पूजाची भूमिका अभिनेत्रीने केतकी कुलकर्णीने साकारली होती.

केतकी कुलकर्णी ही सध्या झी मराठीवरील 'कमळी' मालिकेत कनिका नावाची भूमिका साकारते आहे.

अस्मिता मधील ही गोड , गोंडस मुलगी आता फारच सुंदर दिसते. इतक्या वर्षानंतर ती फारच बदलली आहे.

केतकी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.