पदरावरती जरतारीचा मोर! लिंबू कलरच्या साडीत गौरी कुलकर्णीचा देखणा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:04 IST2024-04-16T15:59:08+5:302024-04-16T16:04:49+5:30

गौरी कुलकर्णी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहचली.

उत्तम अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांची मनं जिंकली.

या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध तसेच संजना या पात्रांप्रमाणेच गौरीही प्रेक्षकांची लाडकी बनली.

सध्या अभिनेत्री गौरी कुलकर्णी सन मराठीवरील 'प्रेमास रंग' यावे या मालिकेत काम करताना दिसतेय.

सध्या गौरी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली रिल चर्चेचा विषय बनली आहे.

या रिलमध्ये गौरीने लिंबू कलरची साडी नेसली आहे. त्यावर साजेसे दागिने घालत तिने लूक पूर्ण केलाय.

गुलाबी, पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या पैठणीत गौरीचं सौंदर्य आणखी खुलून आलंय.