"हम चले बहारों में, गुनगुनाती राहों में..." धनश्री- पूर्णिमाची लोणावळ्यात धमाल; पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 16:25 IST2024-09-23T16:13:41+5:302024-09-23T16:25:34+5:30
'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकर आणि अभिनेत्री पूर्णिमा डे व्हेकेशन एन्जॉय करत आहेत.

मराठी मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. याचा प्रत्यय अनेकदा येतो.
दरम्यान, आपल्या व्यग्र वेळेतून ब्रेक घेत धनश्री तिच्या मैत्रीणींसोबत सुट्टीवर गेली आहे.
अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या तिच्या व्हेकेशनमुळे चर्चेत येत आहे. या फोंटोमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री पूर्णिमा डे देखील दिसते आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या धनश्रीने तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
आजुबाजूला दाट झाडी, डोंगरदऱ्या तसेच झुळझुळ वाहणारं पाणी अशा ठिकाणी या अभिनेत्रींची सफर निघाली आहे.
यातून या सध्या निसर्गाच्या सानिध्यात त्या वेळ घालवत असल्याचं दिसून येत आहे. शिवाय फोटोंमध्ये या दोघींचा मनमौजी अंदाज पाहायला मिळतोय.
फोटोंमध्ये धनश्री आणि पूर्णिंमा त्यांच्या मैत्रीणींसोबत लोणावळ्यात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसत आहेत.