'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतील वैदेही आठवतेय? इतका बदलला अभिनेत्रीचा लूक, दिसते फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:37 IST2025-09-22T17:26:03+5:302025-09-22T17:37:59+5:30

'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतील वैदेही आठवतेय? आता दिसते फारच सुंदर, फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांचं एक अतूट नातं निर्माण झालेलं असतं.

आजवर छोट्या पडद्यावर अनेक मालिका आल्या. मात्र, अशीच एक गाजलेली मालिका ज्या मालिकेचं नाव आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. या लोकप्रिय मालिकेचं नाव म्हणजे 'स्वप्नांच्या पलिकडले'.

२०१० साली आलेल्या 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेत अभिनेत्री गौरी नलावडे आणि चिन्मय उद्गीरकर मुख्य भूमिकेत होते.

या लोकप्रिय मालिकेमध्ये गौरीने साकारलेलं वैदेही नावाचं पात्र अनेकांच्या पसंतीस उतरलं होतं. आजही गौरी या मालिकेसाठी ओळखली जाते. इतकी वर्ष उलटूनही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही.

'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतील साधी, सोज्वल वैदेही आता फारच ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर ती कायम तिचे सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेनंतर गौरीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

लवकरच ती 'वडापाव ' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी ’वडापाव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.