चमचमीत पदार्थ अन् आजीकडून औक्षण! शिवानी सोनारच्या 'घरचं केळवण'; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:18 IST2024-12-23T10:53:32+5:302024-12-23T11:18:20+5:30
शिवानी सोनारच्या घरी तिच्या आई-बाबांनी तिचं खास केळवण केलंय. अभिनेत्रीने फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत (shivani sonar)

मराठमोळी अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्न करणार आहे. लग्नाआधी शिवानीच्या केळवणाला सुरुवात झाली.
शिवानीच्या घरीच केळवणाला सुरुवात झाली असून शिवानीसाठी घरच्यांनी चमचमीत पदार्थांचा बेत केला होता.
यावेळी शिवानीच्या घरच्यांनी एका रुमालावर तिची पावलं उमटवली. हा सुंदर फोटो सर्वांच्या पसंतीस उतरला
शिवानीच्या कुटुंबातील लहान सदस्याने तिचं खास औक्षण केलं. शिवानीचा या लहानग्यासोबत मस्तीखोर अंदाज पाहायला मिळाला
शिवानीने याप्रसंगी आई-बाबांसोबत खास फोटोशूट केलं. लाडक्या लेकीचं केळवण करताना शिवानीचे आई-बाबा आनंदी असलेले दिसत आहेत
शिवानीच्या घरच्या केळवणाला तिची आजीही उपस्थित होती. लाडक्या नातीसोबत शिवानीच्या आजीनेही खास फोटो काढले
शिवानीच्या बाबांनीही लेकीचं केळवण करताना तिचं खास औषक्ष केलं. शिवानी लवकरच तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अंबर गणपुलेसोबत लग्न करणार आहे.