रॉयल कारभार! शिवानी -अंबरच्या साखरपुड्याचे Unseen फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:07 PM2024-04-23T16:07:47+5:302024-04-23T16:15:20+5:30

Shivani sonar: शिवानीने इन्स्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत

राजा रानीची गं जोडी या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

या मालिकेत संजू म्हणजेच संजीवनी ही मुख्य भूमिका साकारुन शिवानीने बरीच लोकप्रियता मिळवली.

काही दिवसांपूर्वीच शिवानीचा मोठ्या थाटात साखरपुडा झाला. शिवानीने अभिनेता अंबर गणपुले याच्यासोबत एंगेजमेंट केली आहे.

शिवानीचा साखरपुडा झाल्यानंतर या सोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

शिवानीने आता तिच्या एंगेजमेंटचे काही अनसीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिवानीने एंगेजमेंटच्या दिवशी लाइट पर्पल लेहंगा आणि गोल्डन-ऑफ व्हाइट असं कलर कॉम्बिनेशन असलेली चोली परिधान केली होती.

शिवानीने अभिनेता अंबर गणपुले याच्यासोबत साखरपुडा केला असून अंबरदेखील लोकप्रिय मराठी अभिनेता आहे.

अंबरने रंग माझा वेगळा, 'लोकमान्य' या मालिकांमध्ये काम केलं आहे.

शिवानी 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतही मुख्य भूमिकेत झळकली आहे. तसंच लवकरच ती एका नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.