'मुरांबा'तील रमाच्या ग्लॅमरस लूकची पुन्हा चर्चा, लाल मिनी वनपीसमध्ये शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:42 IST2024-12-26T13:39:37+5:302024-12-26T13:42:21+5:30
शिवानी मुंढेकर 'मुरांबा' मालिकेत सध्या 'रमा' आणि आता 'माही' या भूमिकेत दिसत आहे.

स्टार प्रवाह'वर दोन वर्षांपूर्वी सुरु झालेली मालिका 'मुरांबा'. या मालिकेतून दोन मुलींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. रमा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर आणि रेवा ची भूमिका साकारणारी निशानी बोरुले.
दोन वेण्या घातलेल्या रमाने सर्वांनाच प्रेमात पाडलं. तिचं निरागस दिसणं आणि सुंदर अभिनय यामुळे ती पहिल्याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
शिवानी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिने नुकतेच हॉट लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
काल नाताळच्या मुहुर्तावर तिने बॅकलेस मिनी रेड वनपीसमध्ये कातिल पोज दिल्या आहे. घराच्या बाल्कनीत तिने हे खास फोटोशूट केलं आहे
या ड्रेसमध्ये ती कमालीची बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत आहे. मोकळे सरळ केस, ऑन पॉइंट मेकअप असा तिचा लूक आहे. तिच्या फोटोंवरुन कोणाची नजरच हटत नाहीए.
मालिकेतल्या भोळ्या-भाबड्या रमाचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही शॉक झालेत. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.
सध्या मालिकेत रमाचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर शिवानी आता रमासारखीच दिसणाऱ्या 'माही' च्या भूमिकेत आली आहे. फक्त ही माही रमासारखी साधी नसून ग्लॅमरस लूकमध्ये आहे.