PHOTO: चांदेकरांच्या संस्कारी सुनेचा ग्लॅमरस अंदाज; हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:44 IST2025-03-19T16:36:13+5:302025-03-19T16:44:10+5:30

'माझ्या नवऱ्याची बायको' तसेच 'जय मल्हार' या मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

मराठी मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील अभिनेत्री झळकली आहे.

सध्या ईशा केसकर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे. अभिनेता अक्षर कोठारेसोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसते आहे.

अलिकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या हटके फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

फिकट हिरव्या रंगाचा बॉडिकॉन ड्रेस परिधान करून ईशाने फार सुंदर फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी तिने केसात जिप्सी फुले माळून सुंदर हेअरस्टाईल केल्याची पाहायला मिळतेय.

ईशाचा हा हटके फॅशनसेन्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.