मराठी अभिनेत्रीची नवऱ्यासोबत दुबई सफर, बिकिनी लूकमध्ये दिली पोज; ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:54 IST2025-12-15T13:35:44+5:302025-12-15T13:54:24+5:30

अभिनेत्रीने अबू धाबी येथील मशिदीतीलही फोटो शेअर केले आहेत.

सध्या अनेक मराठी अभिनेत्री परदेश दौरे करत आहेत. त्यांचे परदेशातील फोटो तर थक्क करणारे आहेत. हिंदी अभिनेत्रींपेक्षा त्या काही कमी ग्लॅमरस नाहीत.

अबु धाबीच्या प्रसिद्ध मशीदीतही तिने भेट दिली. यावेळी तिने ब्लॅक ड्रेस परिधान केला होता आरश्यांचं वर्क आहे. डोक्यावर ब्लॅक ओढणीही घेतली आहे.

सध्या ही टीव्हीवरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री नवऱ्यासोबत दुबई येथे फिरत आहे. येथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ही अभिनेत्री आहे काजल काटे. 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'मुरांबा' या मालिकांमधून काजल काटे हे नाव घराघरात पोहोचलं.

काजलने कमालीचं वजनही घटवलं आहे. तिने तिची ही ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सोशल मीडियावर सर्वांसोबत शेअरही केली होती.

काजलने पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पोज दिली आहे. अबु धाबी येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ती पूल साईड निवांत वेळ घालवत आहे.

दुबईच्या वाळवंटातही तिने सफारी एन्जॉय केली. रेतीवर किलर पोज देत फोटोशूटही केलं आहे. यावेळी तिने केलेला पेहरावही लक्ष वेधून घेणारा आहे.

तसंच तिने नवऱ्यासोबतही रोमँटिक पोज दिली आहे. कालचा नवरा प्रतीक कदम हा मुंबई इंडियन्स टीमचा फिटनेल कोच आहे. त्याच्या फिटनेस तर थक्क करणाराच आहे.