बर्फाची मखमली चादर अन् पतीसोबत रोमान्स! बॉलिवूड सिनेमातला सीन वाटावा असे हृता दुर्गुळेचे फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:57 IST2024-12-31T11:48:13+5:302024-12-31T11:57:42+5:30

हृता तिच्या पतीबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. वाढदिवस आणि न्यू इयर निमित्त दोघेही युरोपातील अझरबैजानमध्ये गेले आहेत.

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

सध्या हृता तिच्या पतीबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. वाढदिवस आणि न्यू इयर निमित्त दोघेही युरोपातील अझरबैजानमध्ये गेले आहेत.

तेथील फोटो हृताचा नवरा प्रतीक शाह याने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

अझरबैजान हा पर्यटकांचं आकर्षण असलेला देश आहे. या देशातील बर्फाच्छादित प्रदेशात हृता आणि प्रतीक क्वालिटी टाइम घालवत आहेत.

हृता आणि प्रतीकच्या रोमँटिक फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचे हे फोटो जणू बॉलिवूड सिनेमातील सीनच असल्यासारखे वाटत आहेत.

"२०२४ ला गुडबाय म्हणत आहोत. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवत आठवणी बनवत आहोत", असं कॅप्शन प्रतीक शाहने या फोटोंना दिलं आहे.

हृता आणि प्रतीकने २०२२ मध्ये लग्न करत संसार थाटला. प्रतीकही कलाविश्वात कार्यरत आहे.