ऐश्वर्या नारकर यांच्या सिंपल लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; लखनवी कुर्तीत केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 04:42 PM2024-04-04T16:42:40+5:302024-04-04T16:47:24+5:30

Aishwarya narkar: केसात गजरा, हलकासा मेकअप यांमध्ये त्यांचं सौंदर्य कमालीचं खुललं आहे.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. गेल्या कित्येक काळापासून त्या कलाविश्वात सक्रीय आहेत.

सध्या त्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

मालिका विश्वाप्रमाणेच त्या सोशल मीडियावरही कमालीच्या सक्रीय आहे. त्यामुळे कायम नवनवीन पोस्ट त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

अलिकडेच त्यांनी एक फोटोशूट केलं असून त्यातील काही निवडक फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जांभळ्या रंगाच्या लखनवी कुर्तीमध्ये त्यांनी छान सिंपल फोटोशूट केलं आहे.

केसात गजरा, हलकासा मेकअप यांमध्ये त्यांचं सौंदर्य कमालीचं खुललं आहे.

ऐश्वर्या नारकर कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात.

ऐश्वर्या नारकर यांचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतो.