कमबख्त इश्क हो गया है! काश्मीरमध्ये गेलेला शिव पडला प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 02:41 PM2022-06-10T14:41:06+5:302022-06-10T14:44:34+5:30

Shiv Thakare: सोशल मीडियावर सक्रीय असलेला शिव कायम चाहत्यांसोबत काही ना काही नवे अपडेट्स शेअर करत असतो.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठी २ च्या माध्यमातून शिव घराघरात पोहोचला.

बिग बॉसप्रमाणेच शिव अन्य काही रिअॅलिटी शोमध्येही झळकला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची वरचेवर चर्चा रंगत असते.

आजच्या घडीला शिव अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत असल्याचं पाहायला मिळतं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला शिव कायम चाहत्यांसोबत काही ना काही नवे अपडेट्स शेअर करत असतो.

सध्या शिव काश्मीरमध्ये त्याची सुट्टी एन्जॉय करत असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ त्याने शेअर केले आहेत.

काश्मीरमधील वातावरण पाहून शिव या ठिकाणाच्या प्रेमात पडला आहे. त्यामुळे कब्खत इश्क हो गया है इनसें!, असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.

शिवने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

शिव त्याच्या सुट्टीचा मनमुरादपणे आनंद घेताना दिसत आहे.