अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी सागर कारंडे करायचा 'हे' काम; पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:33 IST2023-04-19T14:19:15+5:302023-04-19T14:33:02+5:30

Sagar karande: सागरच्या पहिल्या कामाविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. मात्र, फार मेहनत करत आज त्याने यश संपादन केलं आहे.

'चला हवा येऊ द्या' या शोने लोकप्रियतेची एक उंची गाठली आहे. त्यामुळे त्यातील कलाकार कायम चर्चेत येत असतात.

सध्या सोशल मीडियावर अभिनेता, विनोदवीर सागर कारंडे याची चर्चा रंगली आहे.

आपल्या उत्तम विनोदशैलीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनं जिंकणारा सागर आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत आहे.

सागरने कलाविश्वात त्याचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.

कलाविश्वात येण्यापूर्वी सागरने बराच मोठा स्ट्रगल केला आहे.

सागरच्या पहिल्या कामाविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. मात्र, फार मेहनत करत आज त्याने यश संपादन केलं आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सागर एका कंपनीत काम करत होता.

कंपनीत काम करण्यासोबतच तो लहानमोठ्या नाटकांमध्येही काम करायचा.

एकदा चर्चगेट येथे असलेल्या LIC च्या कार्यालयात त्याने एक छोटं नाटकं सादर केलं होतं. त्यासाठी त्याला १०१ रुपये मानधन मिळालं होतं. विशेष म्हणजे ही त्याची आयुष्यातील पहिली कमाई होती.