पच्चाssस तोला प्रेम! रिअल लाइफ पारुसोबत प्रसादचं पाडवा स्पेशल फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 02:52 PM2024-04-12T14:52:15+5:302024-04-12T14:58:40+5:30

Amruta and prasad jawade:

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख.

काही महिन्यांपूर्वीच या जोडीने मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली. त्यामुळे ही जोडी सातत्याने चर्चेत येत असते.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झालेली ही जोडी या शो दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली.

प्रसाद आणि अमृता सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

नुकतंच या जोडीने गुढीपाडव्या निमित्त सुरेख फोटोशूट केलं. यातील काही निवडक फोटो अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रसाद आणि अमृता यांचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे.

या जोडीच्या प्रत्येक फोटोमधून त्यांच्यातील प्रेम, मैत्री दिसून येत आहे.

अमृता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. तसंच कलाविश्वातही तिचा दांडगा वावर आहे.

अमृता तिच्या नाटकांच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.तर, प्रसाद सध्या पारु या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.